Thursday, May 20, 2010

वादळ - प्रश्न की उत्तर

आजपर्यंत मी असा पाऊस पाहिला नाही
जो थांबला नाही वर्षून
असा पूर पाहिला नाही जो ओसरला
नाही येवून

काही स्वप्ने तुटलिही  असतील ह्या गोंधळात
पण सगळे प्रश्न मात्र अनायासे सुटले

माझी माझी म्हणून उराशी कवटाळलेली दुख्खे
क्षणाधार्त वाहून गेली
आणि मागे उरली ती फक्त स्वच्छ पाटी
नव्या स्वप्नासाठी, नव्या भविष्यासाठी

आजपर्यंत मी अशी इमारत पहिली नाही जी
बांधता येत नाही मातीमोल होऊन
अशी स्वप्न जी साकारता येत नाहीत
प्रयत्नांच्या हातून

Friday, May 7, 2010

एक विचार

एकदा तू मला मोगरा आणला होतास
कोमेजल्यावर सुध्धा त्याचा गंध अगदी तसाच राहिला होता.

निदान त्या निर्माल्याएवढ  तरी ताज हव होत रे तुझ प्रेम!
आज आठवणीच्या  कप्प्यात दरवळण्यासाठी सुगंधाबरोबर बरेच काही शिल्लक राहिले असते.