कधी काळी मी कविता लिहायचे. गाता न येण्यासारख्या कविता. "प्राची"ला "गच्ची" जोडणे कधी मला जमले नाही. म्हणूनच कदाचित आता कविता चांगल्या जमत नाहीत. एखादी कविता सुचावी असे सोनेरी क्षण कधीतरीच येतात. अशाच एका सोनेरी क्षणाची हि निर्मिती. माझी कोणे एका काळाची कविता.
अबोल
तू सांगायचास, मी ऐकायचे
ते मी अबोल होते म्हणून नाही
तर तुला बोलायला आवडायचं म्हणून.....
मग तशी प्रथाच पडली
आता दोघाही गप्प असतो.
कारण तुझ्या कडले विषय संपलेत
आणि तुझे ऐकता ऐकता
मी बोलणेच विसरून गेलेय.......
No comments:
Post a Comment